नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. जी. मोरे यांची पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तडकाफडकी बदली केली आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह एका अधिकाऱ्यास लाच घेताना औरंगाबाद येथे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या घटनेची पार्श्वभूमी मोरे यांच्या बदलीमागे असल्याचे सांगितले जाते. सव्वा महिन्यापूर्वी मोरे यांची आडगावला बदली करण्यात आली होती. बदलीनंतर मोरे यांच्याकडे तक्रार निवारण कक्षाचा पदभार सोपविण्यात आला आहे. आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निरीक्षकाची बदली
आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के जी मोरे यांची पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तडकाफडकी बदली केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 4:00 am