नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात भिंतीलगत आठ मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरातील अशी दुसरी घटना आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारागृहाचे हवालदार भाऊसाहेब खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कारागृहाच्या भिंतीलगत गस्त घालत असतांना खरात यांना कृषी गोदामाच्या भागात भिंतीजवळ आठ मोबाइल, हेडफोन व चार्जरही सापडले. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. सहाय्यक निरीक्षक वाळेकर तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी होमगार्डच्या बूटामध्ये सीमकार्ड व मोबाइल सापडले होते.
जेलमध्ये सापडले आठ मोबाइल
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात भिंतीलगत आठ मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिनाभरातील अशी दुसरी घटना आहे.
Maharashtra Times 7 Jun 2016, 12:55 am