अ‍ॅपशहर

जावयाचं धाडस पाहा, सासूच्या घरात घुसला अन् १० लाखांचा मुद्देमाल चोरला; नाशिकची घटना

Nashik News : नाशिकमध्ये जावईच चोर निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही जावयाकडून चोरी झालेला ९ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात यश आलं आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 1:04 pm
नाशिक : 'जावई माझा भला, लेकी मागे आला', आता ही म्हण काहीशी नाहीशी होताना दिसते आहे. कारण नाशिकमधील एक जावई सासरच्या घरच्यांना डोक्याचा ताप ठरला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण जावयाने प्रतापच तसा केला आहे. बेरोजगार जावयाने लेडीज पार्लर चालविणाऱ्या सासूच्या घराची चावी चोरुन साडेदहा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलिसांनी ( Nashik Police News Today ) उघड केली आहे. या भामट्या जावयाची खोडी उघड झाली असून त्याच्याकडून साडेदहा लाखांपैकी साडेनऊ लाखांचे दागिनेही जप्त करण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik news
जावयाचं धाडस पाहा, सासूच्या घरात घुसला अन् १० लाखांचा मुद्देमाल चोरला; नाशिकची घटना


आलोक दत्तात्रेय सानप ( २३ रा. तिरुमाला, गुलमोहर अपार्टमेन्ट, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये सासूच्या बंद घराची चावी चोरून चोरट्या जावयाने घरातून १० लाख ४७ हजार रुपयांचे दागदागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली होती. याबाबत मीरा शशिकांत गंभीरे ( वय ५०, रा. श्री बालाजी पॅराडाईज, मोतीवाला कॉलेजजवळ) यांनी फिर्याद दिली होती. गंगापूर पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी सर्वच सीसीटीव्ही तपासले. त्यात त्यांना मीरा गंभीरे यांच्या जावयासारखी देहयष्टी असलेला संशयित दिसून आला. त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हा घडल्याच्या २४ तासांत ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे २४९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.

बिबड्याची चोरलेली कातडी वन खात्यातीलच; मुख्य सूत्रधाराच्या दाव्याने प्रशासनाचे धाबे दणाणले

लेडीज पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या मीरा गंभीरे यांच्या मुलीने आलोक सानप याच्याशी प्रेमविवाह केला आहे. दरम्यान, अलोकने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. पण सध्या तो सुशिक्षित बेरोजगार आहे. तसेच त्याचे सासुरवाडीला येणे-जाणे असल्याने त्याला घरातील वातावरणाची बरीचशी माहिती झाली होती. सर्वप्रथम त्याने कुठल्या लॉकला कुठली चावी आहे, याची माहिती करून घेतली आणि घराच्या दोन लॉक पैकी एक चावी चोरली. आणि सासू पार्लरला गेल्याची संधी साधत जावयाने सासूच्या घरी पद्धतशीर डल्ला मारला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी भुजबळांना सुनावलं, '...असं कुणालाही काही वाटेल, ते आम्ही करणार नाही'

महत्वाचे लेख