अ‍ॅपशहर

‘त्यांनी’ काकडी फेकली थेट घंटागाडीत!

गेल्या आठवड्यात ४०० रुपये प्रती क्रेट अशा भाव असलेली काकडी ४० रुपये प्रती क्रेट भावात विकली गेली. एका क्रेटमध्ये ४० किलो काकडी मावते. म्हणजेच ४० रुपये दराने काकडीला प्रतिकिलो निव्वळ दोन रुपये भाव मिळाला.

Maharashtra Times 28 Jul 2016, 12:13 am
रामनाथ माळोदे, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kakadi in ghanta gadi
‘त्यांनी’ काकडी फेकली थेट घंटागाडीत!


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दुपारच्या लिलावासाठी आलेल्या काकडीचे भाव कोसळले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी काकडी थेट घंटागाडीत फेकल्याचा प्रकार घडला. काढणीपासून ते बाजारात काकडी आणण्यापर्यंत आलेला खर्चही भरून निघत नसल्याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यांनी असे पाऊल उचलले. गेल्या आठवड्यात ४०० रुपये प्रती क्रेट अशा भाव असलेली काकडी ४० रुपये प्रती क्रेट भावात विकली गेली. एका क्रेटमध्ये ४० किलो काकडी मावते. म्हणजेच ४० रुपये दराने काकडीला प्रतिकिलो निव्वळ दोन रुपये भाव मिळाला.

नाशिक बाजार समितीत रोज सुमारे ४०० ते ५०० क्रेट काकडीची आवक होते. बुधवारी ही आवक दुपट्टीने वाढली. व्यापाऱ्यांना आडत द्यावी लागत आहे तेव्हापासून भाजीपाल्याच्या लिलाव चढ्या दराने होत नाहीत. बुधवारच्या लिलावात संगमनेर, अकोला येथून काकडीची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि अचानक भाव कोसळले. काही शेतकऱ्यांना तर शेतापासून बाजारापर्यंत काकडी आणण्यासाठी आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे त्यांनी काकडी बाजार समितीमध्ये आणून कोणताही फायदा झालेला नाही. त्यांनी बाजार समितीत आलेल्या घंटागाडी काकडी फेकून दिली.

असा आला खर्च अकोला येथून आलेल्या एका शेतकऱ्याला प्रति क्रेट ३० रुपये वाहतुकीची खर्च, १० रुपये प्रति क्रेट तोडण्याचा खर्च, दोन रुपये हमाली असा खर्च आला. त्याने आणलेल्या सात क्रेटला प्रती क्रेट ४२ रुपये खर्च आला. काकडी विकून प्रती क्रेट ५५ रुपये मिळाले. अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याने जगायचे कसे, असे म्हणत त्याचे डोळे पाणावले.

काकडीच्या बियाण्यांच्या खरेदीपासून ते बाजारात विक्रीस आणण्यापर्यंत प्रती किलो कमीत कमी १० रुपये खर्च येतो. एक क्रेट २० किलो पेक्षा जास्त वजनाचे असते. म्हणजे क्रेट मागे १०० रुपये खर्च आहे. ती काकडी केवळ ५० रुपये प्रती क्रेट अशी विकली गेली. खर्च जास्त आणि भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांवर काकडी फेकून देण्याची वेळ आली.

- राजाराम तुपे, शेतकरी, सिन्नर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज