अ‍ॅपशहर

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकजगन्नाथ कोठावदे कालवश

पारतंत्र्याच्या लढ्यात सक्रिय राहून सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या आंदोलनामुळे तुरुंगवास भोगणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ रामचंद्र कोठावदे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

Maharashtra Times 3 Nov 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalwan jagnnath kothawade is no more
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकजगन्नाथ कोठावदे कालवश


पारतंत्र्याच्या लढ्यात सक्रिय राहून सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या आंदोलनामुळे तुरुंगवास भोगणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ रामचंद्र कोठावदे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा जागृत ठेवणाऱ्या कळवण मधील हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी जगन्नाथ कोठावदे उर्फ आप्पा हे सर्वात जुने स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्याच्या लढ्यातील रसिकलाल शहा व पुंडलिक काळू जाधव हे दोनच स्वांतंत्र्यसैनिक आज ह्यात आहेत.

३१ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता मेनरोड वरील राहत्या घरी आप्पांची प्राणज्योत मालवली. आप्पांचा जन्म ५ डिसेंबर १९१९ रोजी झाला होता. ते त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. सन १९३८ ते १९४२ या कालावधीत गावोगावी पारतंत्र्याच्या विरुद्ध लढा सुरू होता. त्यात प्रभातफेरी, वंदे मातरम्, समूहगीत धरणे, आंदोलन अशा एकसूत्री कार्यक्रमात जगन्नाथ आप्पांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सन १९४२ साली चले जाव आंदोलनावेळी त्यांना इंग्रज राजवटीने धुळे येथे बंदिवासात ठेवले. तीन महिन्यांची शिक्षा भोगूनही स्वातंत्र्य मिळेपावेतो आप्पांनी आपले कार्य सुरू ठेवले होते. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी नायब तहसीलदार लिलके यांनी तर औदुंबरवाडीचे अनिल महाराज जोशी, जाणकाई शिक्षण संस्थेचे प्राचार्य जोशी, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक आर. के. महाजन, शिक्षक नेते कारभारी पगार, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन आदींनी वाहिली. आप्पांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज