म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज नाशिकच्या अध्यक्षपदी विजया एकनाथ कंकरेज यांची तीन वर्षांसाठी निवड झाली. त्या भाजप महिला आघाडी नाशिकच्या उपाध्यक्षा आहेत. या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपच्या महानगर उपाध्यक्षा भारती बागूल, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, माजी नगरसेवक कुणाल वाघ, भास्कर घोडेकर, मोहिनी भगरे, मंदा फड, करुणा गायकवाड, सुमन विश्वकर्मा, फिरोज शेख, विलास अहिरे, कुणाल तांदळे, रतन काळे, श्याम बडोदे, सलमान शेख, माजीद शेख आदी उपस्थित होते.