अ‍ॅपशहर

बाजार समिती सभापती निवड आज

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात येणार आहे. यात संचालकांचे बहुमत लक्षात घेता शिवाजी चुंभळे यांची सभापतिपदासाठीची निवड निश्चित समजली जात आहे.

Maharashtra Times 20 Jul 2017, 3:18 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम krishi bazar samiti election
बाजार समिती सभापती निवड आज


नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी गुरुवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात येणार आहे. यात संचालकांचे बहुमत लक्षात घेता शिवाजी चुंभळे यांची सभापतिपदासाठीची निवड निश्चित समजली जात आहे.

बाजार समितीच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा होणार आहे. बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्यात आला होता. १५ संचालकांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे हा ठराव मंजूर झाल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले. हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात चुंभळे यांचा पुढाकार होता. सभापतिपदाची निवडणुकीची तारीख जाहीर होताच बाजार समितीच्या संचालकांची त्यांनी अज्ञातस्थळी सहल आयोजित केली. सर्व संचालक रात्री परत येण्याची शक्यता आहे. पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले संचालकच त्यांच्या विरोधात गेले. त्यामुळे पिंगळे यांच्यासमोर आता मार्गच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे ही निवड बिनविरोध होऊन चुंभळे हे सभापतिपदावर विराजमान होण्याची चिन्हे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज