'मटा कल्चर क्लब'तर्फे सोमवारपासून कार्यशाळा
....
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाण्यासोबत नव्याने काही तरी शिकण्याची हौस बच्चेकंपनीला असते. याच हेतूने 'मटा कल्चर क्लब'तर्फे यंदाची उन्हाळ्याची सुटी यादगार करण्यासाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेतून बच्चेकंपनीला नृत्याच्या अनेक स्टेप्स शिकता येणार आहेत.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे १५ ते २४ एप्रिल या कालावधीत महात्मानगर येथील फिटनेस स्टुडिओ बाय सई संघई येथे नृत्य कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही कार्यशाळा होईल. हिंदी, मराठी गाण्यांच्या तालावर थिरकण्याचे कौशल्य या कार्यशाळेत बच्चेकंपनीला शिकायला मिळणार आहे. पाच ते १४ वर्षे वयोगटातील मुले-मुली या कार्यशाळेत सहभागी होऊ शकणार आहेत. कल्चर क्लब सदस्यांच्या पाल्यांसाठी प्रत्येकी २०० रुपये, तर इतरांसाठी प्रत्येकी ५०० रुपये शुल्क असणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथे किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी २ ते ५ या वेळेत संपर्क साधावा.