म. टा. प्रतिनिधी, नाशिक भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) मध्ये ५९० सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांची भरतीप्रक्रिया होत असून, या अंतर्गत होणाऱ्या मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या आणि प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी हॉल तिकीट तपासून काही अडचण असल्यास परीक्षा विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन एलआयसीतर्फे करण्यात आले आहे. एलआयसीमध्ये 'वर्ग - अ' अंतर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून विपणन, वित्त, विमा जोखीम, विमा गणित शास्त्र, गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान या शाखांमध्ये अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. या पदासाठीची प्राथमिक परीक्षा ४ व ५ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट www.licindia.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे.
एलआयसी परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 4:00 am