निफाड : लासलगाव शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे लासलगाव बाजार समितीमध्ये लिलावासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत आणलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. शहर व परिसरात दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी झालेल्या रिमझिम पावसाने काही काळ गारवा निर्माण झाला होता.
लासलगाव परिसरातहलक्या पाऊससरी
लासलगाव शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली...
Maharashtra Times 17 May 2018, 4:00 am