देवळाली कॅम्प : आज (दि. १०) ख्रिस्ती बांधवांचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे आहे. नाशिकरोड येथील फिलीप चर्चच्या मंडळाने ख्रिस्ती बांधव प्रार्थनेपासून वंचित राहून नये म्हणून भक्ती, प्रवचन व गीतांची सुविधा ही केबलवरील चॅनल नंबर ८१९ एनसीएनवर सकाळी १० वाजता उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर यू ट्यूब चॅनल व फेसबुक पेजवरसुद्धा पाहता येईल. ही माहिती प्रवीण घुले, सायमन भंडारे यांनी दिली.
घरबसल्या ऐका संदेश
आज (दि १०) ख्रिस्ती बांधवांचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2020, 4:00 am