अ‍ॅपशहर

लोहोणेर विद्यालय प्रथम

जनता विद्यालय, देवळा पंचायत समिती शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ, देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१८-१९ चा तालुकास्तरीय अखिल भारतीय ...

Maharashtra Times 26 Jul 2018, 4:00 am

लोहोणेर विद्यालयाचे यश

नाशिक : जनता विद्यालय, देवळा पंचायत समिती शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ, देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१८-१९ चा तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नुकताच झाला. यामध्ये लोहोणेरच्या जनता विद्यालयाची विद्यार्थिनी उत्कर्षा शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर झेप घेतली आहे. उत्कर्षाने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी आपण तयार आहोत का? या विषयावर आपले मत मांडले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक विनीत पवार यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयाने मागील सलग आठ वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात जिल्हास्तरावर झेप घेतली आहे. उत्कर्षा शिंदे व विनीत पवार यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज