अ‍ॅपशहर

मनमाड पाणीप्रश्नी अभ्यास दौरा

मनमाड शहराच्या भूजल पातळीत वाढ होऊन शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनमाडच्या दक्षिण-पश्चिम भागातील कपिलनाथ व हबडाई डोंगरात चर खोदून पाणी जिरवण्याचा उपक्रम राबवणे शक्य आहे.

Maharashtra Times 18 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mamad bachav kruti samiti study tour for manmad city water issue
मनमाड पाणीप्रश्नी अभ्यास दौरा


मनमाड शहराच्या भूजल पातळीत वाढ होऊन शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनमाडच्या दक्षिण-पश्चिम भागातील कपिलनाथ व हबडाई डोंगरात चर खोदून पाणी जिरवण्याचा उपक्रम राबवणे शक्य आहे. राळेगण सिद्धी व हिवरे बाजार प्रमाणे मनमाड परिसरात हा प्रयोग यशस्वी ठरू शकेल, अशी माहिती मनमाड बचाव कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक कचरे यांनी दिली.

मनमाडचा पाणीप्रश्न कसा सोडवता येईल? जलसंवर्धन करून भूजल पातळी वाढविता येणे शक्य आहे का? याची माहिती घेण्यासाठी मनमाड बचाव समितीने रामगुळणा नदी उगमस्थानाचा अभ्यास दौरा केला. त्याबाबत कचरे यांनी माहिती दिली. या दौऱ्यात कातरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील झाल्टे यांनी समिती कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी, सुषमा तिवारी, पुंडलिक कचरे, कृष्णा पगारे, ढेंगळे बाबूजी, अनिता इंगळे, रेखा येणारे, कांतीलाल येणारे, शमशाद सय्यद, मोरे ताई, मंगल केदारे, नसरीन अन्सारी, सुशांत केदारे, गल्लूभाई बगाडे यांनी सहभाग घेतला.

मनमाड बचाव कृती समितीचे निष्कर्ष

कपिलनाथ डोंगराच्या पूर्व-पश्चिम भागातून नऊ घळ्यांच्या पाण्यातून नदीचा उगम होतो. कपिलमुनी डोंगराची लांबी दोन किमी असून, पडणारा पाऊस या नऊ घळ्या व वाघदऱ्या डोंगराच्या पाण्यातून कातरवाडी तसेच रापली, वडगाव, पंगू, नगरचौकी भागातून आपले अस्तित्व निर्माण करतो. हबडाई डोंगर परिसरातील पूर्व-पश्चिम भागातील पाणीदेखील रामगुळणा नदीला मिळते. त्यामुळे डोंगरात चर खोदून पाणी जिरवले, तर मनमाडचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज