अ‍ॅपशहर

मराठा विद्या प्रसारक संस्था गुणवत्तेत अव्वल दर्जाची

अन्नदान, भूदान, रक्तदान या सर्व दानांपेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे, एकशे चार वर्षांपूर्वी मविप्र संस्थेने सुरू केलेला हा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरू ...

Maharashtra Times 22 Aug 2018, 4:00 am

त्र्यंबकेश्वर कॉलेजात कर्मवीरांना अभिवादन

नाशिक : अन्नदान, भूदान, रक्तदान या सर्व दानांपेक्षा ज्ञानदान श्रेष्ठ आहे, एकशे चार वर्षांपूर्वी मविप्र संस्थेने सुरू केलेला हा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरू आहे, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम या संस्थेने केले, असे प्रतिपादन नाशिकचे वसंतराव खैरनार यांनी केले.

मविप्र समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर कॉलेजात आयोजित 'समाजदिन' कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर कडलग, प्रभावती तुंगार, मुख्याध्यापक टी. एस. धोंडगे, प्रा. सुरेश देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे यांनी समाजदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी शुभांग घोटेकर, पूजा चव्हाण प्रा डॉ संदीप माळी, प्रा नीता पुणतांबेकर यांनी सर्व कर्मवीरांच्या कार्याची सखोल माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. छाया शिंदे यांनी केले तर प्रा. प्रवीण गोळे यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज