अ‍ॅपशहर

कुटुंब नियोजनात अद्यापही पुरुष मागेच!

नाशिक : कुटुंब नियोजन करणे ही दोघांची सारखीच जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उत्तर महाराष्ट्रात केवळ ३०.८६ टक्केच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.

फणिंद्र मंडलिक | Maharashtra Times 11 Jul 2017, 4:00 am
उत्तर महाराष्ट्रात केवळ ३० टक्केच पुरुषांनी केली शस्त्रक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम men behind in sterilization
कुटुंब नियोजनात अद्यापही पुरुष मागेच!


नाशिक : कुटुंब नियोजन करणे ही दोघांची सारखीच जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उत्तर महाराष्ट्रात केवळ ३०.८६ टक्केच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. त्यातही नंदुरबारसारखा आदिवासी जिल्हा आघाडीवर असून, येथे ११९ टक्के पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पुढारलेल्या नगर जिल्ह्यात मात्र, पुरुषांचे प्रमाण नगण्य असल्याचेही पुढे आले आहे.

कुटुंब नियोजनाची शस्त्र‌क्रिया करायची झाल्यास पुरुषांवरची शस्त्रक्रिया कमी वेळेची व कमी जोखमीचे असते. परंतु, आजही नसबंदीबाबत पुरुषांची मानसिकता तयार झालेली नाही. लोकसंख्येचा दर जास्त वाढत होता, त्यावेळी महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी या आशयाची जाहिरात केली जात असे. मात्र पुरुषांनी कुटुंब नियोजन करून घ्यावे याची वाच्यता फारशी झाली नाही. कुटुंब नियोजनाची साधने पूर्वी प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे पुरुषांची शस्त्रक्रिया करताना अनेकदा इनफेक्शनमुळे मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणून घरचा धनी वाचला पाहिजे या विचारातून महिला देखील पुरुषांच्या कुटुंब नियोजनाला विरोध करीत असायच्या.

काँग्रेस सरकारच्या काळात या चळवळीने मोठ्या प्रमाणात जोर धरला होता. आरोग्य केंद्रांना टार्गेट दिल्यामुळे अनेकांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. त्यानंतर काही वर्षांनी यात आमूलाग्र बदल झाले. शस्त्रक्रियेत सुलभता आली. परंतु, पुरुष मंडळी या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत.

नगर पिछाडीवर

सहकार क्षेत्रात आघाडरीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सर्वात कमी पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१६ मध्ये ९९८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी केवळ ६४ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये २२१० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे येेेथे जनजागृती करण्याची गरज आहे.

नंदुरबार आघाडीवर

पुरुषांच्या कुटुंब नियोजनाची सर्वात चांगली कामगिरी नंदुरबार जिल्ह्यात झाली. २०१६ मध्ये ३३७ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १०५१ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये ९३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी १११५ शस्त्रक्रिया पार पडल्या. मागील वर्षी एकूण उद्दिष्टांपैकी ३११.८७ टक्के शस्त्रक्रिया झाल्या, तर २०१७ मध्ये ११९.८९ टक्के शस्त्रक्रिया झाल्या.
लेखकाबद्दल
फणिंद्र मंडलिक
फणिंद्र मंडलिक हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत खास प्रतिनिधी, म्हणून कार्यरत आहेत. दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी पत्रकारितेत व्यतित केला आहे. विविध विषयांवर सातत्याने लिखाण करीत असतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज