अ‍ॅपशहर

अल्पवयीन युवतीचा स्टेशनवाडीत विनयभंग

शिवागीळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तरुणाने अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. ही घटना सिन्नर फाटा परिसरातील स्टेशनवाडी भागात घडली.

Maharashtra Times 18 Nov 2017, 4:43 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम molestation in nashik road
अल्पवयीन युवतीचा स्टेशनवाडीत विनयभंग


शिवागीळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तरुणाने अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. ही घटना सिन्नर फाटा परिसरातील स्टेशनवाडी भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तरुणास अटक केली असून, त्याच्याविरूध्द विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकबाल शेरू शेख (रा. गोदरेजवाडी, सिन्नरफाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. विष्णूनगर येथील स्टेशनवाडी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, संशयित तरुण बुधवारी (दि. १५) सायंकाळी शिवागाळ करीत युवतीच्या घराच्या दरवाजाजवळ आला. आमच्या घरासमोर कोणास शिवीगाळ करतो, असा जाब युवतीने विचारल्याने ही घटना घडली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज