अ‍ॅपशहर

परदेशी तरुणास माकडाचा चावा

अंजनेरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या विदेशी तरूणास माकडाने चावा घेतला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Maharashtra Times 19 Jul 2017, 3:32 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monkey attack on foreiner
परदेशी तरुणास माकडाचा चावा

नाशिक : अंजनेरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या विदेशी तरूणास माकडाने चावा घेतला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

वालिद रोकोई (२५ रा. ​​शेरीन मेडोज, गंगापूररोड) असे जखमी युवकाचे नाव आहे. वालिद रोकोई मूळचा अमेरिकेचा असून तो गंगापूररोड भागात काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी वालिद आपल्या मित्रांसह अंजनेरी डोंगरावर फिरण्यासाठी गेला होता. एका हातात छत्री तर दुसऱ्या हातात खाण्याचे पदार्थ घेऊन वालिद डोंगर चढत होता. दरम्यान, वालिदच्या हातात खाण्याचे पदार्थ असल्याने अचानक काही माकडांनी त्याच्यावर हल्ला केला. माकडांनी त्याच्या डाव्या पायास चावा घेतला. रोकोईचा मित्र अभिजित महाले याने त्यास सिव्हिलमध्ये दाखल केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज