अ‍ॅपशहर

जन्मानंतर काही तासांत आईनं मुलीला पिशवीत भरलं, रस्त्याच्या कडेला फेकलं; पुढे भयंकर घडलं

Nashik News: अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकावर अक्षरशः कुत्रे तुटून पडल्याचे पाहून उपस्थितांच्या अंगावर काटे आले. ही अर्भक आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी बघणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमली होती.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2022, 12:28 pm
नाशिक: शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्त्री जातीचे अर्भक फेकल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nashik News
आईने स्त्री जातीच्या अर्भकाला फेकलं

नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या चुंचाळे भागातील एका पाणीच्या टाकीजवळ भटक्या कुत्र्यांची जमलेली टोळी बघण्यासाठी गेलेल्या नागरिकांना
धक्कादायक दृश्य नजरेस पडले आहे. निर्दयी मातेने फेकून दिलेले अर्भकाचे भटके कुत्रे लचके तोडत असताना आढळून आले.

अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकावर अक्षरशः कुत्रे तुटून पडल्याचे पाहून उपस्थितांच्या अंगावर काटे आले. ही अर्भक आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी बघणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमली होती. नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून लावले परंतु हे जग पाहण्याआधीच नकोशी जग सोडून गेली होती. यानंतर नागरिकांनी या प्रकरणी अंबड पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा-मध्यरात्री भर समुद्रातून पाच खलाशांसह मासेमारी नौका बेपत्ता, सिंधुदुर्गात खळबळ

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नवीन नाशिकमधील अंबिका नगर भागात सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तेथील रहिवासी असलेले भागवत बुधा पाटील यांच्या घराजवळील पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात कुमातेने एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक फेकल्याचे आढळून आले. हे अर्भक भटक्या कुत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी परिसरातील कुत्रे जमले आणि फेकून दिलेल्या अर्भकाचे हातापायाचे लचके कुत्र्यांनी तोडले होते. मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांनी त्या ठिकाणी गर्दी केल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा-पांढऱ्या केसांनी संसारात अडथळा; पतीनं केला भलताच कारनामा, पत्नीनं सर्वांसमोरच झोडपलं

निर्दयी मातेने आपले पाप लपवण्यासाठी अथवा अन्य कारणामुळे फेकलेल्या स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्यानंतर नागरिकांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा-धरणावर जाऊन कुटुंबीयांना व्हॉईस मेसेज- 'मी जातेय', आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटूचा अंत

महत्वाचे लेख