जळगाव : एका महिलेवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन सुभाष निंबा मिस्तरी याने अंकुश ऊर्फ बबलू नाना हटकर (वय ३५, रा. रामबाबा कुटिया, तांबापुरा) याचा चॉपरने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री अकराला मेहरुण स्मशानभूमीजवळ घडली. संशयित सुभाषला पोलिसांनी तीन तासांत अटक केली. बबलूची आई अरुणाबाई हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेमप्रकरणातूनतरुणाचा खून
एका महिलेवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन सुभाष निंबा मिस्तरी याने अंकुश ऊर्फ बबलू नाना हटकर (वय ३५, रा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 4:00 am