चांदवड : तालुक्यातील भयाळे येथील ज्योती अरुण गवळी (वय २०) आणि मुलगा शुभम (९ महिने) यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मुत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे अरुण गवळी हे भयाळे येथे आई, पत्नी व मुलगा यांच्या समवेत राहतात. ज्योती व शुभम यांचा मृतदेह परिसरातील सुरेश शिंदे यांच्या विहिरीत आढळून आला. याबाबत पोलिस पाटील निवृत्ती पूरकर यांनी पोलिसांना माहिती दिली. याबाबत वडनेरभैरव पोलिसात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विहिरीत पडल्याने मायलेकाचा मृत्यू
तालुक्यातील भयाळे येथील ज्योती अरुण गवळी (वय २०) आणि मुलगा शुभम (९ महिने) यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मुत्यू झाला ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2019, 4:00 am