म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गोल्डन एज प्रीमियर लीग बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद नाशिक सुपर किंगने पटकावले. या स्पर्धेत सात संघांचा सहभाग होता. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कोपरगावच्या सुपर जायंट संघाचा पराभव केला.
गंगापूर रोडवरील नवरचना शाळेच्या कोर्टवर ही स्पर्धा पार पडली. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक राजेश पाथरकर, अतुल संगमनेरकर तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक अमित देशपांडे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम सामन्यात नाशिक सुपर किंग संघाच्या योगेश दुसाने, चंदन जाधव, मुकेश पवार, धीरेन तिलवानी, तेजस सोमय्या, जावेद पठाण, प्रशांत पाटील, सागर बोराडे यांनी नेत्रदीपक कामिगिरी नोंदवली.