अ‍ॅपशहर

नाशिक-मुंबई महामार्ग ‘समृद्धी’स जोडणार

समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांना जोडणाऱ्या इगतपुरीजवळील पिंप्री सदो येथील वाढीव रस्त्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्याच्या 'एमएसआरडीसीएल'ने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

Maharashtra Times 3 Jan 2020, 4:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम godse


समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांना जोडणाऱ्या इगतपुरीजवळील पिंप्री सदो येथील वाढीव रस्त्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्याच्या 'एमएसआरडीसीएल'ने तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

या दोन्ही महामार्गांच्या जोडणीच्या ठिकाणी तयार होणाऱ्या जंक्शनवर पंधरा बाय साडेपाच मीटर आकाराच्या डबल अंडपासच्या वाढीव कामासाठी तत्त्वत: मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिकरांना आता अवघ्या अडीच तासांतच मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग व व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. इगतपुरी बायपासच्या पिंप्री सदो येथे समृद्धी महामार्ग उतरणार आहे. पिंप्री सदो येथून जवळच काही अंतरावर नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आहे. राष्ट्रीय महामार्गाची जोडणी समृद्धी महामार्गाला व्हावी यासाठी या दोन्हीही महामार्गांच्या दरम्यानचा रस्ता व्हावा, तसेच दोन्ही महामार्गांच्या जोडणीमुळे पिंप्री सदो येथे तयार होणाऱ्या जंक्शनवर मोठ्या आकाराचा अंडर बायपास असावा यासाठी गेल्या वर्षभरापासून खासदार गोडसे प्रयत्न करीत होते. यात त्यांना यश मिळाले आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची अनेकदा भेट घेतली होती. रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्याच्या 'एमएसआरडीसीएल'कडे पाठपुरावा केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज