अ‍ॅपशहर

‘पायरीला गेले तडे’ने याड लावलं

शेतावर राहायचं आणि जागतिक व्हायचं, अशी दुर्दम्य महत्वकांक्षा मनी बाळगणाऱ्या चांदवडच्या विष्णू थोरे या कलंदर चित्रकार कवीचे लवकरच रिलीज होणाऱ्या ‘चौर्य’ या मराठी चित्रपटातील ‘पायरीला गेले तडे’ हे गाणे मराठी रसिकांत लोकप्रिय झाले आहे. फेसबुक पेजवरील या गाण्याच्या व्हिडिओवर तब्बल पावणे तीन लाख यूजर्सने पसंतीची मोहोर उमटवली आहे. ‘सैराट’च्या भन्नाट गाण्यांपाठोपाठ ग्रामीण भागातील विष्णू थोरे यांच्या गाण्याने सध्या रसिकांना ‘याड लावलं’ आहे.

Maharashtra Times 16 Jul 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik payrila gele tade saong
‘पायरीला गेले तडे’ने याड लावलं

शेतावर राहायचं आणि जागतिक व्हायचं, अशी दुर्दम्य महत्वकांक्षा मनी बाळगणाऱ्या चांदवडच्या विष्णू थोरे या कलंदर चित्रकार कवीचे लवकरच रिलीज होणाऱ्या ‘चौर्य’ या मराठी चित्रपटातील ‘पायरीला गेले तडे’ हे गाणे मराठी रसिकांत लोकप्रिय झाले आहे. फेसबुक पेजवरील या गाण्याच्या व्हिडिओवर तब्बल पावणे तीन लाख यूजर्सने पसंतीची मोहोर उमटवली आहे. ‘सैराट’च्या भन्नाट गाण्यांपाठोपाठ ग्रामीण भागातील विष्णू थोरे यांच्या गाण्याने सध्या रसिकांना ‘याड लावलं’ आहे.

नाशिक येथील समीर आशा पाटील या नव्या तरुण दिग्दर्शकाचा चौर्य हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. घरांना दरवाजे नसलेल्या व चोरी होत नाही अशी लोकभावना असलेल्या शनी शिंगणापूर येथील श्रद्धेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात चांदवडचे

ग्रामीण बाज असलेले कवी व चित्रकार विष्णू थोरे यांचे ‘पायरीला गेले तडे’ हे गाणं सध्या फेसबुक पेज व व्हॉट्स अॅपवर धमाका करीत आहे. गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायीले आहे. या गाण्याला २ लाख ८५ हजार युजर्स चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लाभल्याने हा वेगळा विक्रम असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत ८ हजार सातशे ८५ लाईक्स गाण्याला मिळाले आहेत तर तब्बल अडीच हजार रसिकांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर झाला आहे.

चित्रपट क्षेत्रातील पदार्पणात पहिल्याच गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. लाखो लोकांपर्यंत गाणे आजच पोहचले. ही संधी मला मिळाली व त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करीत आहे.

-विष्णू थोरे, गीतकार, चांदवड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज