अ‍ॅपशहर

पोलीस अधीक्षकांची गाडी रोखून केली अरेरावी; टोल नाक्यावर घडला धक्कादायक प्रकार

Nashik News: नाशिकमध्ये पोलीस अधीक्षकांसोबतच धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. पिंपळगाव टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांचीच गाडी अडवण्यात आली. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या या प्रतापावरून पोलीस अधीक्षकांचा संताप झाला आणि त्यांनी कारवाईचे आदेश दिले.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2022, 1:18 pm
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर शुक्रवारी ही घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin patil sp nashik
पोलीस अधीक्षकांची गाडी रोखून केली अरेरावी; टोल नाक्यावर घडला धक्कादायक प्रकार


नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची गाडी पिंपळगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना टोल नाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्र लेन बंद असल्याने त्यांनी गाडी दुसऱ्या लेनमध्ये नेली. परंतु १५ ते २० मिनिटं होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षकांशी हुज्जत घालत अरेरावी केली. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या.

सावधान! घोटी सिन्नर राज्य महामार्गावर पुलाला मोठं भगदाड, प्रशासनाची

पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. दरम्यान कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून प्रचलित असलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून परतत होते. त्यावेळी पिंपळगाव टोल नाक्यावर हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत आता पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला आवर घालण्यासाठी आता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Big Breaking: नाशकात १२ कैद्यांचा पोलिसावर हल्ला, दगडानं डोकं फोडलं,

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज