अ‍ॅपशहर

प्रतिकूल परिस्थितीत स्कॉलरशिमध्ये यश

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनदेखील स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या नाशिक विभागातील चाळीसगाव येथील ए. बी. हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी ऋषिकेश अनिल मुंढे याने विद्यार्थ्यांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. आहे. ऋषिकेशचे वडील अनिल मुंढे चाळीसगावी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, घरच्या परिस्थितीचा बाऊ न करता ऋषिकेशने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत असून, नाशकातही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्याचा गौरव केला.

Maharashtra Times 18 Nov 2016, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik poor student rankes 2nd in scholaship
प्रतिकूल परिस्थितीत स्कॉलरशिमध्ये यश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनदेखील स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या नाशिक विभागातील चाळीसगाव येथील ए. बी. हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी ऋषिकेश अनिल मुंढे याने विद्यार्थ्यांसमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. आहे. ऋषिकेशचे वडील अनिल मुंढे चाळीसगावी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, घरच्या परिस्थितीचा बाऊ न करता ऋषिकेशने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत असून, नाशकातही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी त्याचा गौरव केला.

ऋषिकेश नाशिकमध्ये आल्याचे समजताच स्वतः नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी त्याला आपल्या कार्यालयात बोलावून घेत त्याचा सत्कार करून कौतुक केले. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी घेतलेली दखल बघून ऋषिकेशच्या पालकांना मात्र क्षणभर आकाशठेंगणे झाले होते.

खुद्द विभागीय शिक्षण उपसंचालकांनीच दखल घेतल्याने ऋषिकेशचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. भविष्यात आयआयटीतून इंजिनीअरिंग करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश दिवाळीच्या सुटीत नाशिकरोड येथे आपल्या आत्या मंगल काळे, आशा काळे यांच्याकडे आला होता. परंतु, त्याला थेट शिक्षण उपसंचालकांकडूनच कौतुकाची दिवाळीभेट मिळाली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, विज्ञान सल्लागार अधिकारी माधव पाटील, सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील आदी उपस्थित होते.

---

प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून यश मिळविणारे विद्यार्थी थोडे असतात. स्कॉलरशिप परीक्षेत नाशिक विभागाचे नाव राज्यात झळकवणारा चाळीसगावचा ॠषिकेश मुंढे हा त्यांच्यापैकीच एक असून, त्याचे हे यश इतर शालेय विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

-रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज