अ‍ॅपशहर

रस्ते रुतले चिखलात

शहरालगत येणाऱ्या रासबिहारी परिसरातील चक्रधरनगर, धात्रक फाटा येथील आशा कन्सट्रक्शन, जत्रा हॉटेलजवळील श्रीरामनगर आदी ठिकाणचे रस्ते नुकत्याच झालेल्या पावसानंतर अक्षरशः चिखलात रुतले असल्याची स्थिती आहे.

Maharashtra Times 17 Jul 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, आडगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik road problems in new townships
रस्ते रुतले चिखलात


शहरालगत येणाऱ्या रासबिहारी परिसरातील चक्रधरनगर, धात्रक फाटा येथील आशा कन्सट्रक्शन, जत्रा हॉटेलजवळील श्रीरामनगर आदी ठिकाणचे रस्ते नुकत्याच झालेल्या पावसानंतर अक्षरशः चिखलात रुतले असल्याची स्थिती आहे. नववसाहतींतील रस्ते व इतर नागरी समस्यांकडे महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहरालगत नव्याने विकसित होणाऱ्या नववसाहतींकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असन, प्रशासनाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. या परिसरातील नागरिक विविध नागरी समस्यांनी हवालदिल झाले आहेत. प्रभागरचनेमुळे नगरसेवकांचे दर्शन दुर्लभ झाले असून, समस्या घेऊन जायचे कोणाकडे, असा प्रश्न पडत असल्याच्या तक्रारी आहेत. बहुसंख्य कॉलनी परिसरातील मुख्य मार्गांवर इतका चिखल झालेला आहे की, तेथून वाहने घेऊन जाणे जिकिरीचे झाले आहे. काही ठिकाणी तर चिखलामुळे एक किलोमीटर अंतरावर वाहने उभे करून जावे लागत आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची चिखलामुळे मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांना घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. रस्त्यांवर चिखलासह मोठ्या संख्येने असलेल्या खड्ड्यांमध्येही मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले असून, डासांचे व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची गजर व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणचे पथदीपही बंद असून, त्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे महिलांना संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. अंधाराचा फायदा घेऊन चेनस्नॅचिंगच्या व भुरट्या चोरीच्या घटनांनमध्येही वाढ होत आहे. याबाबतही उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आमच्या परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेकदा पाठपुरावा करूनदेखील कोणतीही उपाययोजना केली जात नाही. नगरसेवकांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. समस्यांबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- विजय पगार

---

परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणवर चिखल झालेला आहे. खड्ड्यांचे प्रमाणही मोठे आहे. यंत्रणेचे परिसराच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची

गरज आहे.

- प्रसाद मोरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज