अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांच्या वारसांना व्यापारी बॅँकेची मदत

नाशिक जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ८५ कुटुंबियांना नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेतर्फे २४ लाख ६९ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जेलरोडच्या इंगळेनगर शाखेत शुक्रवारी (दि. २०) सकाळी नऊला मदतीचा धनादेश प्रदान केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक चोरडिया, मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, श्रीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

Maharashtra Times 19 May 2016, 3:07 am

महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik road vyapari bank
शेतकऱ्यांच्या वारसांना व्यापारी बॅँकेची मदत

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक आणि सभासदांनी घेतला होता. सभासदांनी लाभांशाच्या दोन टक्के, संचालक मंडळाने वर्षभराचा सभा भत्ता आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरले होते. त्यानुसार २४ लाख ६९ हजाराचा निधी जमा झाला आहे. जिल्हाभरातील ८५ कुटंबीयांना प्रत्येकी सुमारे २० हजाराची मदत मिळणार आहे. रक्कम उरली तर मुख्यमंत्री निधीला दिली जाणार आहे. कार्यक्रमानंतर संजय गिते आत्महत्येवर समुपेदशन करतील. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

‘रिपाइं’तर्फेही मदत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना सव्वा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीसाठी नुकतीच देण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील संपत कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष देवीदास दिवेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अतुल भावसार, प्रेमनाथ पवार, शैलेश शिंगवेकर, दिनेश केदार, गोरख गांगुर्डे, वाहिद खान, सुनील बर्वे, आदी उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असल्याच्या निमित्ताने सव्वा लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज