अ‍ॅपशहर

वृक्षारोपणाचे आता उपग्रहाद्वारे ट्रॅकिंग

नाशिक : वृक्षारोपणातील बनवेगिरीला लगाम लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळेच नाशिकच्या महाराष्ट्र वनविकास महामंडळाने पहिल्यांदाच झाडे लावण्याच्या कामात जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) चा वापर सुरू केला आहे. या सिस्टीममुळे खड्डे खोदण्यापासून झाडांची वाढ होईपर्यंतची सर्व माहिती जीपीएसद्वारे मिळणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून या साऱ्या परिस्थितीवर नजर ठेवतानाच झाडांच्या लागवडीतील गौडबंगालही दूर आहे.

Maharashtra Times 26 May 2016, 4:00 am
राज्यात प्रथमच यंदा होणार वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik tree plantation
वृक्षारोपणाचे आता उपग्रहाद्वारे ट्रॅकिंग

gautam. sancheti @timesgroup. com

नाशिक : वृक्षारोपणातील बनवेगिरीला लगाम लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळेच नाशिकच्या महाराष्ट्र वनविकास महामंडळाने पहिल्यांदाच झाडे लावण्याच्या कामात जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम) चा वापर सुरू केला आहे. या सिस्टीममुळे खड्डे खोदण्यापासून झाडांची वाढ होईपर्यंतची सर्व माहिती जीपीएसद्वारे मिळणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून या साऱ्या परिस्थितीवर नजर ठेवतानाच झाडांच्या लागवडीतील गौडबंगालही दूर आहे.

नाशिकच्या वनविकास महामंडळाने त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी व पेठ तालुक्यातील ५२५ हेक्टरमध्ये तब्बल ७ लाख ५३ हजार ५७५ झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही झाडे लावण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून झाडांच्या संख्येइतकेच खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, या खड्ड्याचा ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम रिपोर्टही आता आले आहेत. आता या खड्ड्यात झाडे केव्हा लावली, त्याची वाढ किती झाली, अशा सर्व प्रश्नांची माहिती मिळणार आहे. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने बदलही टिपले जातात. गेल्या तीन वर्षांपासून राज्याला दुष्काळाच्या झळा बसत असल्यामुळे वनविकास महामंडळाने झाडे लावण्याच्या संख्येत यावर्षी तब्बल १ लाख ७० हजाराने वाढ केली आहे. वृक्षारोपणासाठी हरसूल येथील दलपतपूर रोप वाटीकेत सागाची ४ लाख २ हजार ३३० रोपे, तर मखमलाबाद रोपवाटीकेत साडेसात लाख रोपे आहेत. ७ जूनपासून ही झाडे टप्याटप्याने लावण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने सर्वच विभागात झाडे लावतांना जीपीएस सिस्टीमचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गैरव्यवहारालाही आळा बसेल. त्याचप्रमाणे किती हेक्टरवर झाडे लावली, त्याची माहिती या सिस्टीममुळे मिळणार आहे. - अभिमान मयेकर, सर्व्हेअर, वनविकास महामंडळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज