अ‍ॅपशहर

Lockdown: लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही, पण... भुजबळांचं सूचक वक्तव्य

करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन केलं आहे.

Authored byविनोद पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2021, 1:39 pm

हायलाइट्स:

  • करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात
  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा पत्रकारांशी संवाद
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chhagan Bhujbal
नाशिक: करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे करोनाच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,' असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
वाचा: 'अजितदादांच्या मनातलं ओळखता येईल अशी भाषा शिकणार'

शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी करोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संमेलनात नियमांचे कठोर पालन

नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबाबत ते म्हणाले की, करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामध्ये नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनासाठी महिनाभराचा कालावधी बाकी आहे. यासाठी काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात येत असून साहित्य संमेलनाच्या ठिकाणी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल. या कार्यक्रमस्थळी मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येऊन गर्दी होणार नाही याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

वाचा: रायगडावर 'अशी' रोषणाई अपमानास्पद; संभाजीराजे भडकले
लेखकाबद्दल
विनोद पाटील
‌‌विनोद पाटील हे महाराष्ट्र टाइम्स,नाशिक आवृत्तीत विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारीतेत त्यांचा २३ वर्षाचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयात दहा वर्ष कामाचा अनुभव आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये राजकीय, महापालिका, शहरविकास व पायाभुत सुविधा, आदिवासी, सहकार या विषयावर लिखाण करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज