अ‍ॅपशहर

‘निफ’च्या दुसऱ्या दिवशी खाद्यपदार्थांचा दरवळ

सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत स्थानिक खाद्यप्रेमींसाठी देशाविदेशातील पारंपरिक खाद्यांविषयी स्पेशल स्पर्धा झाली. यावेळी विविध फास्ट फूड तसेच विविध खाद्यपदार्थ बनवून दाखविण्यात आले.

Maharashtra Times 25 Mar 2017, 3:25 am
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम niff festival cockery show
‘निफ’च्या दुसऱ्या दिवशी खाद्यपदार्थांचा दरवळ


सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत स्थानिक खाद्यप्रेमींसाठी देशाविदेशातील पारंपरिक खाद्यांविषयी स्पेशल स्पर्धा झाली. यावेळी विविध फास्ट फूड तसेच विविध खाद्यपदार्थ बनवून दाखविण्यात आले.

गृहिणींनी तयार केलेल्या रेसिपीची चव विष्णू मनोहर यांनी चाखली आणि त्याला पसंतीची पावती दिली. सुमारे ७० हून अधिक नाशिककरांनी यात सहभाग घेतला. निफ महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी महात्मा पायलट बाबा यांची उपस्थिती होती. प्रवेशिकांमधून १०० चित्रपट स्क्रिनिंगसाठी निवडण्यात आले आहेत. त्यात दुपारी बियाबान ही कृष्णकांत पांडे यांची फिल्म दाखविण्यात आली.

स्थानिक कलाकारांना चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी दरवर्षी होत असलेल्या निफ मिस इंडिया स्पर्धेअंतर्गत निफ मिस नाशिक, मिस्टर नाशिक व मिसेस नाशिक २०१७ आयोजित करण्यात आली. शनिवारी, २५ मार्च रोजी ही स्पर्धा होणार आहे. विवाहितांसाठी प्रथमच अशी स्पर्धा होत आहे. यात स्पर्धकांना चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रातले मार्गदर्शन करण्यात आले. ही स्पर्धा निफ फिल्मी कट्टा येथे झाली. निफ २०१७ मध्ये विशेष निफ स्टुडिओ उघडण्यात आला असून नवीन कलाकारांना मार्गदर्शन, मोफत फोटोग्राफी, पोर्टफोलिओ शूट, ऑडिशन लिंक बनवून देण्यात आल्या.

यावेळी राजू द सेव्हिअर, दहावी पास, लेफ्ट हॅण्ड रुल, एक लम्हा जिंदगी का, अभिनय, छेडछाड, टेन्डा, ती एक अस्तिवात, मोनी-मा, सुम्मी, बीयाबान-द कुर्स बाय वुमन, साखी, रिदम ऑफ लाईफ, ब्रेव्हरी, क्युट गर्ल ८७, ऑफ बीट, सखी- ऍन इनोसंट फ्रेंड, ह्युमन, चारहात, मानवता, रिस्पेक्ट २, ब्रोकन पाईसेस, अवनी, द रिलीजीअस, रावेन हे लघुपट दाखविण्यात आले.


निफ महोत्सवात आज

महोत्सवात शनिवारी, २५ मार्चला दुपारी १२.१५ वाजता दास्ता ए रफी-रजनी आचार्य तसेच सायंकाळी ७ वाजता कासव हा सुमित सुखटणकर यांचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटांनतर डॉ. मोहन आगाशे यांच्याशी विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज