अ‍ॅपशहर

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक

महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळविता यावे यासाठी केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे मोठेपण दाखवित आहे. राज्यात १२ टीएमसीच्या प्रकल्पांचा भार केंद्राने उचलण्याऐवजी महाराष्ट्रावर का टाकला जातोय, असा सवाल नितीन भोसले यांनी उपस्थ‌ित केला आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 4:00 am
म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitin bhosle speake on water problem
केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक


महाराष्ट्रातील पाणी गुजरातला पळविता यावे यासाठी केंद्र सरकार हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे मोठेपण दाखवित आहे. राज्यात १२ टीएमसीच्या दोन प्रकल्पांसाठीचा आर्थिक भार केंद्राने उचलण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवर का टाकला जातोय, असा घणाघाती सवाल माजी आमदार नितीन भोसले यांनी उपस्थ‌ित केला आहे.

आमचे पाणी पळवून आमच्याच माथी खर्च टाकणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थ‌ित केला. खासदार गोडसे यांनी नदीजोड प्रकल्पांतर्गत १२ टीएमसीचे दोन प्रकल्प मंजूर करवून आणल्याबद्दल भोसले यांनी गोडसेंचे अभिनंदन केले आहे. भंडारदऱ्यापासून गिरणा खोऱ्यापर्यंत डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे सुमारे १५६ टीएमसी पाणी समूद्रात वाहून जाते असा माधवराव चितळे समितीचा अहवाल आहे. या १५६ टीएमसी पाण्यापैकी १३६ टीएमसी पाणी गुजरातकडे वळविण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. परंतु या प्रकाराबद्दल गोडसे यांनी एकही शब्द का उच्चारला नाही, असा सवाल भोसले यांनी उपस्थ‌ित केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज