अ‍ॅपशहर

‘नोटाबंदीने अनेकांचा रोजगार हिरावला’

खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, फसव्या घोषणा व खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांना भूलवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. राफेल घोटाळ्याबाबत मोदी बोलत नाही. नोटाबंदीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला असल्याची टीका पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

महाराष्ट्र टाइम्स 22 Jan 2019, 5:07 am
पंचवटी : खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, फसव्या घोषणा व खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांना भूलवण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. राफेल घोटाळ्याबाबत मोदी बोलत नाही. नोटाबंदीमुळे अनेक लोकांचा रोजगार गेला असल्याची टीका पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम note ban many losses jobs due to demonetisation
‘नोटाबंदीने अनेकांचा रोजगार हिरावला’


नाशिक शहर, जिल्हा व ग्रामीण कॉँग्रेसच्या वतीने स्वामिनारायण मंदिर हॉल येथे आयोजित एकदिवसीय संवाद प्रशिक्षण शिबिराच्या (दि. २१) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उत्तर महाराष्ट्र प्रभारी चेल्ला वामशी चाँद रेड्डी, संवाद प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक आमदार रामहरी रूपनवार, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजीमंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापराव वाघ, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव हेमलता पाटील आदी उपस्थित होते.

या संवाद प्रशिक्षण शिबिरात काँग्रेसच्या लोकांनी केलेले कार्य तसेच काँग्रेस व भाजप यांच्यामधील फरक सूचक उदाराहणे, चित्रफित, ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून राजीव शाहू, नैशाध परमार, विनोद नायर यांनी माहिती दिली. सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, लक्ष्मण धोत्रे यांनी ध्वजारोहण केले. नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनिल कोठुळे, बबलू खैरे, विजय पाटील, उद्धव पवार आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज