अ‍ॅपशहर

‘त्यांचा’ आवाज वाढलाच

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाढलेला आवाज २८ गणेश मंडळांना महाग पडला आहे. मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी कक्षेत ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या गणेश मंडळांसह डीजे मालकांना नोटिसा पाठवण्यात येणार आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 4:42 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम notice to 28 ganesh mandal
‘त्यांचा’ आवाज वाढलाच


विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाढलेला आवाज २८ गणेश मंडळांना महाग पडला आहे. मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी कक्षेत ८० डेसिबलपेक्षा अधिक डीजे आवाज करणाऱ्या गणेश मंडळांसह डीजे मालकांना नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रक्रियेनुसार मंडळ अध्यक्ष व डीजे मालकांचे म्हणणे ६० दिवसाच्या आत ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांच्या आदेशान्वये डीजेचा आवाज मोजण्यासाठी आवाज मोजमाप यंत्रे पोलिस ठाण्याला देण्यात आली होती. पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत डीजेचे आवाज मोजण्यात आले. त्यात मनमाड विभागात २८ मंडळांच्या डीजेचा आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. यात येवला शहरातील १०, येवला तालुक्यातील पाच, मनमाड परिसरातील पाच, चांदवडमधील चार आणि वडनेर भैरव येथील चार अशा एकूण १८ गणेशमंडळांचा समावेश आहे

जिल्ह्यातील मोठी कारवाई
सदर मंडळाचे अध्यक्ष व संबंधित डीजे मालक अशा ५६ जणांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. डीजेचा आवाज जास्त असलेल्या मंडळांना पुरस्कार योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच डीजेसंदर्भात ही जिल्ह्यातील मोठी कारवाई मनमाड विभागात झाल्याचेही डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.

अशी आहेत मंडळे
पोलिस स्टेशन.......गणेश मंडळे
येवला शहर.......१०
येवला तालुका........५
मनमाड........५
चांदवड........ ४
वडनेर भैरव........ ४
एकूण ........ १८

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज