नाशिक : कोर्टाच्या आवारात ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपींविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विकी सानप, कैलास दराडे, विजय कांदळकर, रमेश चांगले, शेखर पवार अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत दशरथ पांडुरंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. एक जून रोजी दुपारच्या सुमारास पाटील कोर्टात गेले होते. कोर्टातील काम आटोपून ते दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी गेले असता हे संशयित तेथे आले. तिथे त्यांनी पाटील यांना ठार मारण्याची धमकी दिली. सुनील चांगले सुटला, की तुझा गेमच करणार अशी धमकी देत संशयितांनी शिवीगाळ केली. पीएसआय डी. वाय. पवार तपास करीत आहेत.
सराईतांविरोधात गुन्हा
कोर्टाच्या आवारात ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत आरोपींविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...
Maharashtra Times 3 Jun 2018, 4:00 am