अ‍ॅपशहर

कांद्याचे अनुदान त्वरित अदा करा

सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाने देवळा येथे मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच जाहीर केलेले कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित अदा करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले.

Maharashtra Times 27 Nov 2016, 4:00 am
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion grant issue
कांद्याचे अनुदान त्वरित अदा करा


म. टा. वृत्तसेवा, कळवण

सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाने देवळा येथे मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच जाहीर केलेले कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित अदा करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले.

या देण्यात आलेल्या निवेदनात, राज्य सरकारने संपूर्ण राज्यात हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू केले आहेत. सरकारने मक्याचा १,३६५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र देवळा येथे मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी मका व्यापारी १,००० ते १,१०० रुपयांनी मका खरेदी करीत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

तसेच सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन महिन्यांपासून तूटपुंजे अनुदान जाहीर केले आहे. मात्र ते अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तरी शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, योगेश आहेर, जगदीश पवार, अनंत अहिरराव, सुनील आहेर आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी सभापती अशोक आहेर, साहेबराव सूर्यवंशी, चंद्रकांत आहेर उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज