अ‍ॅपशहर

पंचवटी एसटी डेपोत आग

जुन्या आडगाव नाका येथील पंचवटी शहर बस वाहतुकीच्या डेपोतील रद्दी ठेवलेल्या खोलीस मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:53 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panchvati st depo fired
पंचवटी एसटी डेपोत आग


जुन्या आडगाव नाका येथील पंचवटी शहर बस वाहतुकीच्या डेपोतील रद्दी ठेवलेल्या खोलीस मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीत शहर बस वाहतुकीचे जुने रद्दीचे कागदपत्र जळाली तसेच येथे ठेवण्यात आलेल्या चार खुर्च्यां आगीत खाक झाल्या.

सकाळीच्या सत्रातील चालक आणि वाहक पंचवटी डेपोतून बस घेऊन बाहेर पडण्याच्या तयारीत असताना काही कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या हजेरी रुमच्या शेजारच्या खोलीतून धूर निघत असताना दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने इतर कर्मचारी धावून आले. खोलीतील रद्दीला आग लागल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बस डेपोमधील आग विझविण्याचे सिलिंडर घेऊन त्यापासून आग विझविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यातील एकालाही सिलिंडर उघडता आले नाही. फरशीच्या तुकड्यांनी हे सिलिंडर फोडण्याचा त्यांनी निष्फळ प्रयत्न केला. काहींनी प्लास्टिकच्या बादल्यामधून पाणी आणून ते खिडक्यातून आगीवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्यानंतर या दलाने खोलीत पाणी मारून आग इतरत्र पोहचू नये याची दक्षता घेतली. आग विझविण्यात आल्यानंतर या खोलीत असलेली रद्दी बाहेर काढण्यात आली. त्यावेळी खोलीत असलेल्या जुन्या खुर्च्याही आगीत जळून खाक झाल्या.

कुठे झाले नुकसान?

अर्धवट जळालेल्या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नोंदवही अशा कागदपत्रांच्या गठ्ठ्याचे प्रमाण जास्त होते. विद्यार्थी सवलतीच्या जुन्या पासेस आदी प्रकारचे रद्दीचे कागदपत्र असल्याने नुकसान झालेच नाही, असे येथील अधिकाऱ्यांकडूनव सांगितले जात होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज