अ‍ॅपशहर

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं उघड

शवविच्छेदनानंतर हाणामारीतच विपुलचा मृत्यू झाल्याचं आज सकाळी स्पष्ट झालं आहे. यामुळे कुटुंबियांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2022, 2:20 pm
नाशिक : शहरातील द्वारका चौकात खून झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात उघड झालं आहे. गुरुवारी रात्री आनंदवल्ली परिसरातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैरे (रा. शुभम पार्क) याचा मृतदेह आढळला होता. आज सकाळी शवविच्छेदनानंतर हाणामारीतच विपुलचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुटुंबियांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलीस पुढील गुन्हा दाखल करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik murder news
नाशिक हत्या प्रकरण


विपुल अभोणा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तिथे शिकत असलेला विपुल शहरात कसा आला, हे कुटुंबियांनाही माहिती नव्हते. परंतु, त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या.

नेमकं काय घडलं?

विपुल खैरे हा डिजीपी नगर येथील रहिवासी आहे. तो अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. बेंडकुळे नगर येथे गुरुवारी रात्री काही नागरिक फिरत असताना त्यांना दुचाकी व एक बॅग दिसली होती. थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मृतदेहावर खरचटल्याच्या खुना आढळून आल्या होत्या. त्यानंतर शवविच्छेदन केलं असता मारहाणीतच विपुल खैरे याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज