नाशिक : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, या विधेयकामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्या संबंधित सर्व घटकांचे नुकसान होणार असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी सर्व खासगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलने काम बंद आंदोलन केले. संपात नाशिक शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे एकूण साडेतीन हजार डॉक्टर सहभागी असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
खासगी डॉक्टर संपावर
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, या विधेयकामुळे देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्या संबंधित सर्व घटकांचे नुकसान होणार असल्याचा ...
Maharashtra Times 29 Jul 2018, 4:00 am