दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथील पाचवीत शिक्षण घेणारा शुभम राजेंद्र काळोगे (वय ११) या मुलावर बिबट्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले. त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परमोरी येथील कंपनीजवळील राजेंद्र काळोगे यांच्या शेतात शुभमचे आईवडील टोमॅटो खुडत असताना त्यांच्यापासून अवघ्या दहा फुटांववर बिबट्या दबा धरून बसला होता. शुभमला पाहताच बिबट्याने हल्ला करीत त्याच्या मानेला चावा घेत सुमारे ३० फूट ओढत नेले. परमोरी येथील ही पाचवी घटना आहे.
बिबट्याचा हल्ला
तालुक्यातील परमोरी येथील पाचवीत शिक्षण घेणारा शुभम राजेंद्र काळोगे (वय ११) या मुलावर बिबट्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 4:00 am