अ‍ॅपशहर

अवनीसाठी आज नाशिकमध्ये रॅली

अवनी वाघिणीला निर्दयपणे मारल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी शहरातील प्राणीप्रेमी रॅली काढणार आहेत...

Maharashtra Times 11 Nov 2018, 4:00 am

नाशिक : अवनी वाघिणीला निर्दयपणे मारल्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी शहरातील प्राणीप्रेमी रॅली काढणार आहेत. अवनीच्या पिलांचे पुनर्वसन करावे आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळवून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये रविवारी शरण फॉर अॅनिमल्स, गिव्ह आणि इको इको यांसारख्या स्वयंसेवी संस्थांनी शांततेत रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी चार वाजता कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटपासून या रॅलीला सुरुवात होईल. कॉलेजरोड मार्गे भोसला कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत ही रॅली येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज