अ‍ॅपशहर

चुलत काकाचा पुतणीवर बलात्कार

तालुक्यातील काळुस्ते येथील नऊ वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षीय चुलत काकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी सोमवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास घराजवळ राहणाऱ्या आपल्या नऊ वर्षीय पुतणीला शौचालयात घेऊन गेला

Maharashtra Times 10 May 2017, 3:29 am
म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape on girl by her uncle
चुलत काकाचा पुतणीवर बलात्कार


तालुक्यातील काळुस्ते येथील नऊ वर्षाच्या बालिकेवर १६ वर्षीय चुलत काकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी सोमवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास घराजवळ राहणाऱ्या आपल्या नऊ वर्षीय पुतणीला शौचालयात घेऊन गेला. शौचालयात मोबाइलमधील अश्लील चित्रफित दाखवत त्याने बालिकेवर अतिप्रसंग केला. यामुळे चिमुरडी भयभीत झाली. दरम्यान, तिने ही सर्व घटना कुटुंबीयांना सांगितली. वडिलांनी धाव घेत इगतपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताला अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांनी उप निरीक्षक एन. बी. सोनवणे, महिला पोलिस एन. ए. पटेकर आणि पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज