अ‍ॅपशहर

टाकळीत रथसप्तमी उत्सव साजरा

समर्थ रामदासांनी सन १६२० रथसप्तमीच्या दिवशी श्री रामदास स्वामी यांनी येथील गोदा-नंदिनीच्या संगमात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून 'श्रीराम जय राम, जय जय राम' या तेराक्षरी मंत्राने पूरश्चरणास प्रारंभ केला. या स्मरणार्थ येथील ट्रस्टच्या वतीने काल रथसप्तमी उत्सव साजरा करण्यात आला.

Maharashtra Times 25 Jan 2018, 4:00 am
टाकळीत रथसप्तमी उत्सव साजरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rathsaptmi festival at taklli nashik deolali camp area
टाकळीत रथसप्तमी उत्सव साजरा


समर्थांच्या पादुका व कुबडीचे पूजन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

समर्थ रामदासांनी सन १६२० रथसप्तमीच्या दिवशी श्री रामदास स्वामी यांनी येथील गोदा-नंदिनीच्या संगमात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून 'श्रीराम जय राम, जय जय राम' या तेराक्षरी मंत्राने पूरश्चरणास प्रारंभ केला. या स्मरणार्थ येथील ट्रस्टच्या वतीने काल रथसप्तमी उत्सव साजरा करण्यात आला.

'जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी,अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे, गोदा तटी हे स्थान जागृतीचे॥' असा महिमा असलेल्या येथील आगर टाकळी मठात असलेल्या समर्थांच्या तत्कालीन पादुका व कुबडी यांची बुधवारी (दि. २४) सकाळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत रामदास स्वामी मठ ट्रस्टचे व्यवस्थापक दत्तात्रय जुन्नरे यांच्या हस्ते पादुका व कुबडी गोदावरी-नंदिनी नेण्यात आल्या. तेथे परंपरेप्रमाणे विधिवत कुबडी व पादुकांना जलाभिषेक करण्यात आला. या वेळी १०८ वेळा रामनाम जपासह गायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन पहिला नैवेद्य पाण्यातील माशांना देण्यात आला. पुढे पहिल्या गोमय हनुमानाची आरती करण्यात येऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, डॉ. अरविंद चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद जोशी, रत्नाकर अणेकर, सुरेश कुलकर्णी, रवींद्र नवसे यांसह गावकरी व समर्थभक्त उपस्थित होते. दिवसभर समर्थांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी शेकडो समर्थभक्तांनी मंदिरात हजेरी लावत समर्थांच्या तपश्चर्या करण्याच्या गुहेस भेट देत गोमय मारुतीचे दर्शन घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज