अ‍ॅपशहर

उत्तुंग यश प्राप्तीसाठी वाचनाला पर्याय नाही

प्रा डॉ डी पी पवार यांचे प्रतिपादन म टा...

Maharashtra Times 22 Sep 2018, 4:00 am

प्रा. डॉ. डी. पी. पवार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रंथांचे वाचन व अभ्यास केवळ परीक्षा आणि पदवी घेण्यासाठी नसून जीवनात कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही, म्हणून महाविद्यालयीन युवकांनी वाचनाचा ध्यास घ्यावा आणि आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. दिलीप पवार यांनी ओझर महाविद्यालयात केले.

मविप्र समाज संस्थेच्या ओझर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वाङमय मंडळाचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पवार बोलत होते अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. आर. एच. ठाकरे होते. प्रारंभी सरस्वती पूजन आणि अक्षरगंगा या भित्तीपत्रकाचे अनावरण डॉ. पवार यांचे हस्ते झाले. याप्रसंगी मंचावर मराठी विभागप्रमुख प्रा. किरण चव्हाण, प्रा. नारायण पाटील, सिनेट सदस्या डॉ. कल्पना आहिरे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. आर. बी. शिंदे, हिंदी विभागप्रमुख डॉ. दीपा कुचेकर, कनिष्ठ विभागाच्या प्रा. श्रीमती जे. डी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. पवार यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर,अब्राहम लिंकन, माउन्ट एल्फिंस्टन आदी महापुरुषांच्या जीवनातील विविध प्रसंग कथन केले आणि आपल्या कविताही सादर केल्या. विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती जोपासावी असे प्रा. ठाकरे यांनी सांगितले. मराठी विभाग प्रमुख प्रा. किरण चव्हाण यांनी वाङमय मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा नारायण पाटील यांनी परिचय करून दिला. गायत्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गायत्री जाधव, गायत्री चौधरी, ऋषिकेश गवळी, शीतल धनराळे, अनुजा पवार आदींनी परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज