अ‍ॅपशहर

पिंपळगावातून दानपेटी चोरीस

शहरात घरफोड्यानंतर चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष केले आहे. सोमवारी निफाड रोडवरील रानमळ्यातील कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी लंपास केली आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:19 am
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम robbery in temple at pimpalgaon baswant
पिंपळगावातून दानपेटी चोरीस


शहरात घरफोड्यानंतर चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष केले आहे. शनिवारी पहाटे शहरातील शिवाजीनगर भागातील शनीमंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सोमवारी निफाड रोडवरील रानमळ्यातील कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी लंपास केली आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून मंदिरातील दानपेटी उघडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे दानपेटीत अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये असतील, असा अंदाज परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव बसवंत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसात दोन मंदिरांची दानपेटी फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज