अ‍ॅपशहर

मुसळधार पावसात संभाजीराजेंनी सर केला विश्रामगड

संभाजीराजेंचा काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात संभाजी राजेंनी नाशिकचा विश्रामगड सर केला आहे. त्यामुळं सोशल मीडियावर सध्या संभाजी राजेंच्या या फोटोंची चांगलीच चर्चा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2021, 4:49 pm
संभाजी राजे महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांवर अनेकदा भेटी देतात. गड- किल्ल्यांच्या कामाची पाहणी स्वतःहून करतात. गड किल्ल्यात रमणारा माणूस असंही त्यांचं कौतुक कार्यकर्ते करतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sambhaji raje visit vishram gad in nashik
मुसळधार पावसात संभाजीराजेंनी सर केला विश्रामगड


भरपावसात विश्रामगड किल्ला सर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचं सावट आहे. नाशिकमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. सध्या संभाजी राजे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी भरपावसात विश्रामगड किल्ला सर केला आहे.

शिवपदस्पर्श दिन

निमित्त होते शिवपदस्पर्श दिनाचे. छत्रपती शिवरायांनी या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर १६७९ रोजी विश्रामगडावर विश्रांती घेतली होती. या इतिहासाला उजाळा देत याची आठवण म्हणून संभाजीराजेंनी स्वतः भर पावसात किल्ला सर करीत किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा केला.

जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष

यावेळी विश्रामगडावर उपस्थित 'शिवभक्तांनी जय शिवाजी,जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणांनी विश्रामगड दणाणून सोडला होता.

शिवरायांनी घेतली होती विश्रांती

सुरतेच्या लुटेहून येतांना शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर विश्रांती केल्याचा इतिहास सांगितला जातो. त्यामुळे संभाजी राजेंच्या उपस्थितीत आज या किल्ल्यावर शिवपदस्पर्श दिन साजरा होत आहे

गडाचे नामांतर झाले

२२ नोव्हेंबर १६७९ या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराजांनी विश्रामगडावर आले होते. राजांनी १५ दिवस या गडावर विश्रांती घेतली. यामुळे महाराजांनी गडाचे नामांतर करत ते विश्रामगड ठेवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज