अ‍ॅपशहर

पंढरीची वारी आहे माझे घरी…

अशी भागवत धर्माची उदात्त शिकावण व वारकरी संप्रदायाची असलेली परंपरा जपत टाळांचा गजर करीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे. बुधवार, (दि. २२) दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या विसाव्यासाठी नाशिकरोडला आगमन झाले.

Maharashtra Times 23 Jun 2016, 4:00 am
नाशिकरोडला वारकरी निवत्तिनाथांच्या चरणी लीन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sant nivruttinath palakhi at nashikroad
पंढरीची वारी आहे माझे घरी…


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

पंढरीची वारी आहे माझे घरी /

आणिक न करी तीर्थ व्रत //१//

नाम विठोबाचे घेईन मी वाचे,

बीज कल्पांतिचे तुका म्हणे //३//

अशी भागवत धर्माची उदात्त शिकावण व वारकरी संप्रदायाची असलेली परंपरा जपत टाळांचा गजर करीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे. बुधवार, (दि. २२) दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या विसाव्यासाठी नाशिकरोडला आगमन झाले.

नाशिक-पुणे महामार्गावरून मुक्तिधामच्या दिशेने येणाऱ्या पालखीचे बिटको चौकात आगमन झाले. त्यावेळी नाशिकरोडकरांच्या वतीने आमदार योगेश घोलप, मनपा प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे, राजू लवटे, केशव पोरजे, निवृत्ती अरिंगळे आदींनी स्वागत केले. मुक्तिधाम मंदिराचे विश्वस्त जगदीश चौहान यांनी संत निवृत्तिनाथांच्या पादुका डोक्यावर घेत मुक्तीधामच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या प्रभू रामचंद्रासमोर पादुका ठेवण्यात येऊन मंदिराचे विश्वस्त हिरालाल चव्हाण,जगदीश चव्हाण यांच्या हस्ते नागेश देशपांडे यांच्या पौरोहित्याखाली पाद्यपूजा व आरती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पालखीचे मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, सोहळाप्रमुख पंडित महाराज कोल्हे, व्यवस्थापक पुंडलिकराव थेटे, अनिल गोसावी, निवृत्ती महाराज चाफेकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. मुक्तिधाम मंदिर परिसरात हजारो वारकऱ्यांना साई प्रतिष्ठान यांच्यावतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. दुपारी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर पालखीसह वारकऱ्यांनी आपल्या पुढील मुक्कामाकडे प्रस्थान केले. पंढरीच्या दिशेने आगेकूच करत निघालेल्या या पालखीला निरोप देताना उपस्थित भाविकांच्या नयनांत अश्रू तरळल्याचे दिसत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज