अ‍ॅपशहर

सप्तशृंगीचे दर्शन ४ दिवस राहणार बंद

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात संरक्षक जाळीत अडकलेल्या दगडांना बाजूला करण्यासाठी रेस्क्यू टीम मंगळवापर्यंत येणार आहे. त्यामुळे बुधवार (दि. २०)पासून सलग चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेंज यांनी दिली.

Maharashtra Times 18 Jun 2017, 12:55 pm
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saptshringi darshan stopped from wednesday
सप्तशृंगीचे दर्शन ४ दिवस राहणार बंद


कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात संरक्षक जाळीत अडकलेल्या दगडांना बाजूला करण्यासाठी रेस्क्यू टीम मंगळवापर्यंत येणार आहे. त्यामुळे बुधवार (दि. २०)पासून सलग चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेंज यांनी दिली. उत्तराखंडच्या टीमसह स्पेनहून काही तंत्रज्ञ या कामासाठी येणार आहेत.

सोमवारी (दि. १२) सप्तशृंग गडावर भगवती मंदिर परिसरात पावसाच्या आगमनापूर्वी दरड कोसळली. संरक्षक जाळ्या बसविलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर १३ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध‌िकारी आणि मेकॅबरी कंपनीचे संचालक यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. कोसळलेल्या दगडांना बाजुला काढण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा लागणार आहे. या कामात कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून २१ पासून सलग चार दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवावे लागणार आहे. याबाबत देवस्थान प्रशासन व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. उत्तराखंड येथून रेस्क्यू टीम निघाली असून, मंगळवारपर्यंत ही टीम कळवण येथे पोहोचणार आहे. त्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून मंदिर ट्रस्टला मंदिर सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत कुठलीही सूचना मिळालेली नाही.

उत्तराखंड येथील टीम मंगळवारपर्यंत आली तर बुधवारपासून दगड बाजूला करण्यात येतील. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल. चार ते पाच दिवस हे काम सुरू राहू शकते.
- सुरेंद्र कंकरेंज, कार्यकारी अभियंता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज