अ‍ॅपशहर

सातपूरच्या मळे परिसरात रस्त्यांची चाळण

औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या सातपूर गावातील मळे परिसरातील रस्त्यांची समस्या काही सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्यांसाठी हजारो एकर जमिनी देऊनदेखील शेतकऱ्यांना घराकडे जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत आहे.

Maharashtra Times 13 Aug 2017, 4:00 am
शेतकऱ्यांचा अडखळत प्रवास सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम satpur area road issue
सातपूरच्या मळे परिसरात रस्त्यांची चाळण


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या सातपूर गावातील मळे परिसरातील रस्त्यांची समस्या काही सुटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्यांसाठी हजारो एकर जमिनी देऊनदेखील शेतकऱ्यांना घराकडे जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत प्रभाग २६ चे नगरसेवक रस्ते कामांकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नुकत्याच झालेल्या प्रभाग बैठकीत प्रभाग ११ च्या नगरसेविका सीमा निगळ यांनी मळे परिसरातील रस्त्यांना महापालिका व नगरसेवकांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर सातपूरकरांच्या हजारो एकर जमिनी सरकारने आरक्षित केल्या होत्या. सातपूर नगरपालिका असताना दिवंगत नगराध्यक्ष रामचंद्र पाटील-निगळ यांनी जकातीच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न सुरू केले होते. यानंतर महापालिकेत समावेश झालेल्या सातपूर गावाकडे सातत्याने दुर्लक्षच केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

पाणी, वीजसमस्याही सोडवा

कारखान्यांना जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना घराकडे जाताना खडतर रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. याबाबत वेळोवेळी मळे परिसरातील रहिवाशांनी रस्ते, पाणी व विद्युत पोलांची सुविधा मिळावी, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मागणीकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच मळे परिसरातील हजारो रहिवाशांना प्रवास करण्याची वेळ येते. महापालिका व नगरसेवकांनी मळे परिसरातील रहिवाशांची मागणी लक्षात घेता रस्त्यांची उभारणी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज