शिवसैनिक जाणार अयोध्येला
अयोध्या दौरा करण्यासाठी नाशिकमधील शिवसैनिक २३ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड स्टेशनवरून रवाना होणार आहेत...
पंचवटी : अयोध्या दौरा करण्यासाठी नाशिकमधील शिवसैनिक २३ नोव्हेंबर रोजी नाशिकरोड स्टेशनवरून रवाना होणार आहेत. या दौऱ्याच्या आयोजनासाठी नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात आडगाव आणि नांदूर येथे बुधवारी बैठक झाली. यामध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख महेंद्र बडवे, शिवसेना नेते राजू लवटे, दिलीप मोरे, माजी नगरसेवक शिवाजी निमसे, विधानसभा प्रमुख नितीन चिडे, मल्हारी मते, सुरेश मते, उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, समन्वयक शिवा ताकाटे, सुनील निरगुडे, नीलेश मोरे, पोपट शिंदे, संजय माळोदे आदी उपस्थित होते.