अ‍ॅपशहर

नाशिकच्या श्रीमूर्तींचे बहरिनमध्ये योगधडे

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बहारिनमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या योगा इन्स्ट‌ट्यिूटच्या माध्यमातून आखाती देशास योगाचे धडे देण्यासाठी नाशिकमधील योगशिक्षक डॉ. श्रीमूर्ती यांची निवड झाली आहे.

जितेंद्र तरटे | Maharashtra Times 20 Jun 2017, 4:00 am
नाशिक ः तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बहारिनमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या योगा इन्स्ट‌ट्यिूटच्या माध्यमातून आखाती देशास योगाचे धडे देण्यासाठी नाशिकमधील योगशिक्षक डॉ. श्रीमूर्ती यांची निवड झाली आहे. या कार्यासाठी देशभरातून केवळ तीन योगशिक्षकांना ही संधी मिळाली आहे. यातील डॉ. श्रीमूर्ती हे नाशिकचे तर उर्वरित दोघांपैकी एक जण पश्चिम बंगाल आणि दुसरे बिहारमधील रहिवासी आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shrimurthi guide in baharin
नाशिकच्या श्रीमूर्तींचे बहरिनमध्ये योगधडे


चेन्नईतील १३६.१ योगा सेंटरच्या माध्यमातून यावेळी ते एक वर्षासाठी बहारीन मध्यपूर्वेकडील पार्शियन आखातीमधील छोट्याशा व्दीपावर वसलेल्या देशात जाणार आहेत. तेथील राजधानी मनामा येथे ते वास्तव्यास असतील. मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखलीचे रहिवासी असणारे ज्ञानोबा लाड तथा डॉ. श्रीमूर्ती यांनी योगाभ्यासात पुढे जाण्यासाठी अत्यंत खडतर परिस्थितीशी दोन हात केले आहेत. आई-वडिलांना शेती कामात मदत करत होमिओपॅथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ डॉक्टर म्हणून रूग्णांना सेवा दिली. मात्र योगाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. डॉ. श्रीमूर्ती यांनी बिहार स्कूल ऑफ योगामधून ‘अप्लाईड योगा’ (व्यवहारातील योगशास्त्र) या विषयात एम.एससी. पदवी मिळविली. यानंतर दीड वर्ष कतार या आखाती देशातील नागरिकांना योग शिकविल्यानंतर मालदीव बेटावरही हे कार्य त्यांनी केले. नाशिकमध्ये स्थिर होत त्यांनी नाशिककरांना योगाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. ते पुढील आठवड्यात बहरिनमध्ये जाणार आहेत. ते तेथे वर्षभर सेवा देतील.

बुधवारी (२१ जून) बहारिनमधील योग इन्स्ट‌ट्यिूटचे उद‌्घाटन होणार आहे.

या निमित्ताने ‘मटा’शी बोलताना डॉ. श्रीमूर्ती म्हणाले , ‘मुस्लीमबहूल देश आणि योग या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. त्या देशांमधील नागरिक योगाला स्वीकारून या शास्त्रात अचंबित करणारी प्रगती करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज